गोमंतक ही देवभूमी असून या देव भूमीत अनेक हिंदू सनातन संस्कृतीचा इतिहास लाभलेला आहे .हिंदू धर्मच सुख शांती भक्तिमार्ग दाखवू शकतो याच प्रेरणेतून लहान पणापासून भक्ती संगीताची गोडी लावल्याने मुलांमध्ये चांगले संस्कार होऊन देशभक्ती वाढीस लागावी या प्रेरणेतून संस्थेने सुरसंगीत महाकेंद्र प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन कार्यक्रम पार पडले .यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध भजनी कलाकार गुरुवर्य मा ,श्री,प्रदीप रामा नाईक सुप्रसिद्ध संगीत कलाकार दिग्दर्शक गौरव पुरस्कार प्राप्त प्रमुख पाहुणे मा, श्री नारायण श्रीराम शेठ तनावडे प्राचार्य मा ,श्री संतोष चारी श्री मती रेणुका नाईक संस्थेचे समाजसेवक मा ,श्री योगेश सेठतानावडे संस्थेचे समाजसेवक शिवभक्त कल्लाप्पा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते .
यावेळी त्यांच्या हस्ते श्रीसरस्वती माता फोटो पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
त्यानंतर मान्यवरानी आपल्या भाषणात इलेक्ट्रॉनिक मोबाईल युगात इतिहास कला संस्कृतीकडे पालक मुलांच्या दुर्लक्षामुळे आपली संस्कृती कमी होत चालली आहे .यामुळे पालकानी लक्ष घालून आपल्या बाळ गोपाळांना सुरसंगीत भजन विद्याद् यावी ,न संपणारी ही विद्या आहे असे मत गुरु नाईक यांनी व्यक्त केले .
भजन संगीत ही विद्या इतकी मोठी आहे ही सुख शांतीचा भक्ती चा मार्ग दाखवते.त्यानंतर नारायण तानावडे आपल्या भाषणात सुरसंगीत महाकेंद्र या परिसरात चालू केल्याबद्दल संस्थेचे आभार चारी यांनी मांडले .गुरु विनाविद्या विद्या विना गुरु हे शिष्याना गुरुचे महत्व रेणुका नाईक यांनी सांगितले .श्रीमती शकुंतला विरेकर यांचे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेने आभार मानले .याप्रसंगी संभाजीनगर मुरगांव तालुका चाफेरान झरीवाडे विद्या मंदिर वाडेम निवाडे चिखली इतर परिसरातील विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .