सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात येणाऱ्या टिळकवाडी विभागाच्या माध्यमिक क्रीडा स्पर्धांना 28 जुलैपासून सांघिक खेळांनी प्रारंभ करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.
28 जुलै रोजी बास्केटबॉल डीपी स्कूल येथे 30 जुलै रोजी टेबल टेनिस केएलएस स्कूल येथे एक ऑगस्ट रोजी योगा व बुद्धिबळ केएलएस स्कूल येथे चार ऑगस्ट रोजी वॉलीबॉल व कबड्डी केएलएस स्कूल येथे 8 ऑगस्ट रोजी बॅडमिंटन ओरिएंटल स्कूल 10 ऑगस्ट रोजी हँडबॉल केएलएस स्कूल 12 ऑगस्ट रोजी क्रिकेट व बॅडमिंटन डेपो मैदान येथे तर 17 व 18 ऑगस्ट रोजी फुटबॉल मुला-मुलींसाठी लेले मैदानावर घेण्यात येणार याचे निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.तसेच ॲथलेटिक स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडांगणावर घेण्यात येणार आहेत.