बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सरकारी शाळेतील मुलांसोबत माध्यान आहार सेवन करून आपला साधेपणा दाखवला आहे.त्यांनी शहापूर येथील अळवाण गल्ली येथील सरकारी शाळेला भेट देऊन येथील मुलांना देण्यात येणाऱ्या माध्यान आहाराची चाचणी केली .तसेच शाळेत ठेवण्यात येणारे देखील शुद्ध आहे की नाही याची तपासणी केली .
दरम्यान त्यांनी मुलांसोबत बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेत असलेल्या जेवणात दर्जेदार डाळ आणि तांदूळ का वापरले जात नाहीत असा प्रश्न उपस्थित केला .तसेच बीईओना याबाबत विचारणी करून निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी सूचना केली.