विजेचा अपव्यय टाळा असा संदेश देणाऱ्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील नार्वेकर गल्ली येथील पथदीप दिवसाढवळ्या सुरुच असल्याचे पहायला मिळाले
महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील पथदीप बंद न केल्याने विजेचा अपव्य होत आहे. एकीकडे बंद पडलेले पथदीप दुरुस्त करण्याकडे काना डोळा करण्यात येतो.
तर दुसरीकडे चालू अवस्थेतील पथदीप सुरुच असलेले पाहायला मिळतात. येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान मार्गावरील सर्वच पथदीप आज सकाळपासूनच सुरू असल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.



