शिकाऊ कारचालकाच्या धडकेत सफाई कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी गोवावेस येथील बसवेश्वर सर्कल जवळ येईल एलआयसी भवन च्या आवारात घडली आहे.
अनिता राजेश बन्स वय 56 असे या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव असून ती आनंदवाडी पिके कॉटर्स येथील रहिवासी होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की शिकाऊ वाहन चालक सकाळ सत्रात गाडीचा सराव करत असताना या ठिकाणी झाडलोट करत असणाऱ्या महिलेवर चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांने अनिता यांना धडक दिली यामध्ये सदर महिला चिरडली गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला
यावेळी या घटनेची माहिती मिळताच रहदारी दक्षिण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला . यावेळी मॉर्निंग वॉकर्स नी घटना पाहण्याकरिता मोठी गर्दी केली होती.