मंजिले या उपक्रमांतर्गत महिलांना चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे निर्णय जीतो लेडीज विंग तर्फे घेण्यात आला आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन उद्यमबागमधील मारुती सुझुकी शोरूम मध्ये करण्यात आले. यावेळी जीतो लेडीज विंगच्या समन्वयक भारती हार्दि यांनी महिलांनी आत्मनिर्भर होण्याकरिता विविध कौशल्य अंगीकारले पाहिजे असे मत व्यक्त केले.
तसेच अध्यक्षा रुपाली जनाज यांनी ड्रायव्हिंग प्रशिक्षण कशाप्रकारे गरजेचे आहे हे सांगितले.त्यानंतर मंजिले या उपक्रमांतर्गत महिलांना कार ड्रायव्हिंग चे प्रशिक्षण देण्यात आले.