सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना चिकनगुनिया आणि डेंग्यू यासारख्या आजारांना तोंड द्यावे लागू नये याकरिता बीके कंग्राळी येथील चव्हाट गल्लीत आषाढ एकादशीनिमित्त चिकनगुनिया आणि डेंग्यू लसीकरण प्रतिबंधात्मक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर ग्रामपंचायत सदस्य यलोजीराव पाटील आणि डॉक्टर जगताप जय गणेश होमिओपॅथिक क्लिनिकतर्फे रविवार दिनांक 10 जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी 12 पर्यंत येथे पार पडणार आहे.तरी या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे