शहरातील विकास कामे करताना स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांना आणि व्यवसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूला शेजारी असलेल्या सर्विस रोडवरील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरून दुकानातील साहित्याचे नुकसान झाले आहे.
पावसाचे पाणी गटारीच्या माध्यमातून ओव्हरफ्लो होऊन ड्रेनेज मधून बाहेर पडून व्यवसायिकांच्या दुकानात शिरला असल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून येथील माणिकबाक ऑटोमोबाईल परिसरातील व्यवसायिकांची दुकाने बंद आहेत.
त्यामुळे येथील दुकानांसमोर निर्माण झालेल्या पूर सदृश्य परिस्थितीमुळे येथील व्यवसायिकांनी आपल्या मागणीचे निवेदन मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांच्याकडे सादर केले आहे.
यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी तेथील परिसरात साचलेले गटारीचे सांडपाणी ओव्हरफ्लो होण्याच्या समस्येवर लवकरात लवकर उपाययोजना काढून व्यवसायिकांना दिलासा देऊ असा विश्वास व्यक्त केला आहे