मॉर्निंग वॉकर्स च्या मदतीकरिता जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राइड सहेलीच्या सदस्या धावून आल्या आणि त्यांनी वॉकिंग ट्रॅक वर उगवलेले गवत काढून पादचारांसह मॉर्निंग वॉकर्स ना वापरणाण्याकरीता ट्रक मोकळा करून दिला आहे.
त्यांनी येथील उड्डाण पुलावरील उगवलेले काँग्रेस गवत यासह अनेक विषारी छोटी झाडे काढून मॉर्निंग वॉकर्स ना फुटपाथ आणि ट्रॅक मोकळा करून दिला आहे तसेच याठिकाणी गवत मोठ्या प्रमाणात वाढवून या गवताचा धोका उड्डाणपुलाला होणार आहे हे लक्षात घेऊन आपल्या परीने जमेल तितका कचरा गोळा करून तो महानगरपालिकेच्या गाडीत घालून पाठवून दिला आहे.
यावेळी सकाळच्या सत्रात जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम प्राइडच्या सहेली एकत्रित आल्या आणि आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो या भावनेतून त्यांनी कामात सुरुवात करून मॉर्निंग वॉकर्स ना ट्रक मोकळा करून दिला