अतिशय क्लिष्ट शस्त्रक्रिया करून लेकव्हूव हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी एका तरुणीचा डावा खांदा आणि हात वाचविला आहे. सदर शस्त्रक्रिया झालेली तरुणी बस मध्ये प्रवास करत असताना तिने आपला डावा हात खिडकीबाहेर ठेवला होता.यावेळी बसच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने तिच्या हाताला जबर दुखापत झाली होती.त्यामुळे तिचा हात पूर्णपणे रिकामी झाला होता तसेच रक्तवाहिनांना देखील गंभीर दुखापत झाली होती .
त्यामुळे या युवतीवर गांधीनगर येथील लेकव्हुव्य हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते.यावेळी येथील आर्थोपेडिक सर्जन डॉक्टर बी एस पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने युवतीच्या हातावर अवघड अशी शस्त्रक्रिया करून तिला पूर्णपणे बरे केले आहे.
येथील कार्डिओरॅसिक व्हासक्युलर सर्जन डॉक्टर के कटीमनी भूलतज्ञ डॉक्टर व्ही. बेवीनगिडद व त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली असून तर युवतीचे कुटुंबीय डॉक्टरांचे आभार मानत आहेत