आजी आजोबा सुद्धा कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या प्राण्या पक्षांचा आनंद घेता यावा त्यांना डोळे भरून पाहता यावे याकरिता ॲलन मोरे यांच्या नेतृत्वाखाली जैन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येथील कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाला व्हीलचेअर भेट म्हणून दिल्या आहेत.
कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालय मोठे आहे. यामध्ये अनेक प्राणी पक्षी आहेत. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या आजी आजोबा आणि दिव्यांग व्यक्तींना हे प्राणी पक्षी पाहण्याकरिता सुलभ व्हावे यासाठी त्यांना दोन व्हीलचेअर सुपूर्द करण्यात आल्या आहेत.
सामान्य व्यक्ती प्रमाणेच आजी आजोबा आणि दिव्यांग व्यक्ती देखील प्राणी संग्रहालयातील वातावरणाचा आनंद याद्वारे लुटू शकतील हा या मागचा त्यांचा हेतू आहे.
यावेळी व्हिलचेअर सुपूर्द करते प्रसंगी जैन महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह पशुवैद्यकीय अधिकारी नागेश हुयलगोळ प्राणी संग्रहालयाचे रक्षक रायप्पा, आदित्य जी,अद्वैत चव्हाण,नितीन कोटारी,आर्यन नलावडे भाग्यवान सोळंकी ध्रुव हंजी यांच्यासह अलन मोरे देखील उपस्थित होते.