कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या अथणी तालुक्यातील शिरहट्टी गावाला आज सकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला यावेळी सकाळी 6. 22 मिनिटांनी हा धक्का बसला असून या भूकंपाने नागरिक भयभीत झाले.
यावेळी मॉर्निंग वॉकर्सनी याचा अनुभव घेतला. जवळपास पाच ते सहा सेकंद हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला यामध्ये कोणतीही हानी झाली नसल्याचे समोर आले. त्यानंतर यावेळी अथणीचे डीवायएसपी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.