दूध सागर धबधबा सध्या प्रवाहित झाल्याने पर्यटकांची पावली आपसूकच दूध सागर धबधब्याकडे वळत आहेत. तसेच या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढला असल्याने अनेक युवक या ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दूध सागर धबधबा पाहण्यावर सध्या बंदी घालण्यात आली आहे.
कर्नाटक गोवा महाराष्ट्र या राज्यातील अनेक पर्यटक पावसाळ्यामध्ये दूध सागर धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. मात्र सध्या येथे युवकांकडून होत असलेल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून पुढे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता येथील धबधबा पाहण्यासाठी बंदी करण्यात आली आहे.