आषाढी एकादशी आणि रविवारच्या निमित्ताने येथील नार्वेकर गल्लीतील ज्योतिर्लिंग देवस्थान विठ्ठलाची मूर्ती ठेवून आकर्षक आरास करण्यात आली आहे.
यावेळी सकाळी मंदिरात सकाळी ज्योतिबा आणि विठ्ठलाला अभिषेक करून खिचडीचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. तसेच दुपारी बारा वाजता महाआरती करून सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
यंदा पहिल्याच वर्षी जोतिबा मंदिरात विठ्ठलाची मूर्ती ठेवून आकर्षक आरास करण्यात आल्याने भाविकांनी मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दादा अष्टेकर भक्त मंडळ परिवारातर्फे करण्यात आले आहे.