कुकडोळ हे गाव भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने दत्तक घेण्यात आले आहे. त्यामुळे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. युवकांसाठी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या अनुदानातून रू. 10 लाख मंजूर करून देण्यात आले आहेत. त्यातून व्यायाम शाळेचे बांधकाम सुरू आहे. त्याचा स्लॅब भरणी कार्यक्रम भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना जाधव म्हणाले भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने संघटनेच्या कामा बरोबरच विकास कामे सुद्धा सुरू आहेत अनेक गावामधे व्यायाम शाळा, हाय मास्क, ग्रंथालय, रस्ते, मंदिरे आदींची निर्मिती केली जात आहे. CSC सेंटर च्या माध्यमातुन जनतेला आवश्यक सरकारी कागदपत्रे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना पुरविल्या जात आहेत. असे ते म्हणाले.
यावेळी भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ सरचिटणीस पंकज घाडी ,कार्यालय चिटणीस नारायण पाटील, शिधाप्पा हुकेरी ,व ग्रामस्थ उपस्थित होते