गुरुपौर्णिमेनिमित्त येथील बापट गल्लीतील कार पार्किंगमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर उभारण्यात आले आहे. तसेच या मंदिरात गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर येथील मंदिरात स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. काल या मंदिरात विविध धार्मिक विधी करून मंदिराचे उद्घाटन करून चांदीचा लेप लावलेल्या पादुकांची स्थापना करण्यात आली.तसेच काळसारोहण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुसरे दिवशी म्हणजे आज गुरुवार दिनांक 14 जुलै रोजी सकाळी गणहोम करण्यात आला. त्यानंतर दुपारी बारा वाजता स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
यावेळी या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला उत्तरचे आमदार अनिल बेनके हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी स्वामी समर्थ महाराज मंदिरात जाऊन स्वामींचे दर्शन घेतले. त्यानंतर एडवोकेट राजेंद्र गायकवाड यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आमदार अनिल बेनके यांनी बोलताना मंदिराला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास तसेच बापट गल्लीतील भक्ती संस्कृती भजनी मंडळाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी त्यांनी महाप्रसादाकरिता उपस्थित असलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी जवळपास हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.