आज शुक्रवार दिनांक 15 आणि उद्या शनिवार दिनांक 16 जुलै रोजी शाळांना सुट्टी देण्याची घोषणा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे. बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याकरिता त्रास उद्भवू नये याकरिता त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी हा आदेश एका पत्रकाद्वारे कळविला आहे.
काल पालकांनी बेळगाव मध्ये होत असलेल्या संत धार पावसाबद्दल चिंता व्यक्त करत जिह्वाधिकाऱ्यांना शाळांना सुट्टी देण्याचे किंवा या काळामध्ये घेण्यात येणारे चाचणी पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना दोन दिवस सुट्टी देण्याचा आदेश बजाविला आहे
बेळगाव बरोबरच खानापूर तालुक्यातील शाळांना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी बजावली आहे. खानापूर तालुक्यातील हालात्री नदीला पूर आल्याने पाणी रस्त्यावर आले आहे.तसेच येथील 35 गावांचा संपर्क तुटला आहे.तसेच उचगाव जवळील मार्कंडेय नदीतील पाणी शेतातून शिरले असल्याने खबरदारी म्हणून शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस सुट्टी देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे.