दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन व राष्ट्रीय विषाणूजन्य कार्यक्रम संपन्न झाला .याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री चिदंबर अग्निहोत्री आणि प्रमुख पाहुणे म्हणून दीपा गट्टद मॅडम उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागत गीताने झाली .मुख्याध्यापक श्री पी आर पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यानंतर श्री आर एन पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली यानंतर आरोग्य अधिकारी श्री चिदंबर अग्निहोत्री यांनी आपल्या प्रबोधनाला सुरुवात केली. सुरुवातीला जागतिक लोकसंख्या दिनाबद्दल माहिती देताना देताना त्यांनी आपल्या देशाची लोकसंख्या किती झपाट्याने वाढत आहे याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली .लोकसंख्या वाढीमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले यासाठी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जागृती निर्माण करण्याची गरज आहे असे सांगितले.
यानंतर डेंगू ताप मलेरिया चिकन गुनिया कर्करोग इत्यादी रोगावर माहिती देऊन या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधक उपाय सांगितले .विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आहार कसा असावा याची माहिती दिली .डेंग्यू ताप हा रोग एडीस इजिप्त हा डास चावल्यामुळे होतो डास जाऊ नये म्हणून मच्छर अगरबत्ती व मच्छरदाणी याचा नियमित वापर करावा या डासावर नियंत्रण ठेवायचे असल्यास डासाचे जीवन चक्र खंडित करणे अत्यावश्यक आहे .यासाठी आपला परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे स्वच्छते बद्दल सुद्धा मार्गदर्शन करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे सांगितले .शेवटी विद्यार्थ्यांशी संवाद साधून शंकांचे निरसन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर ए पाटील आणि आभार प्रदर्शन आर ए परब यांनी केले.