जनावरांना चारा टाकायला गेला असता गोठ्यातील भिंत अंगावर पडून एका बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना काल रात्री दहाच्या सुमारास खानापूर तालुक्यातील लिंगनमठ ग्रामपंचायत व्याप्तीमध्ये येणाऱ्या चिंचवड गावात घडली आहे.
या घटनेत अनंतू धर्मेश पाशेट्टी वय 15 असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घराची भिंत जीर्ण झाली होती. त्यामुळे ती कोसळून बालकाचा मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती समजताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.