No menu items!
Sunday, December 22, 2024

बेळगाव जिल्ह्यात 6, तर देशभरात 154 ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरी

Must read

काळानुसार ‘हिंदु राष्ट्रा’साठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवा !

  • श्री. हृषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती

सुखस्य मूलं धर्मः ।’, म्हणजे सुखाचे मूळ धर्माचरणात आहे. समाज आणि राष्ट्र सुरळीत चालवायचे असेल, तर धर्माच्या अधिष्ठानाची सर्वच क्षेत्रांत आवश्यकता आहे. व्यक्तीगत किंवा सामाजिक जीवनात धर्माचे अधिष्ठान आले की, व्यक्ती नीतीमान बनतो आणि गैरप्रकार करण्यापासून परावृत्त होतो. त्यामुळे धर्माचे अधिष्ठान असेल, तरच धर्मनिष्ठ अर्थात् आदर्श अशा समाजाची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राला खर्‍या अर्थाने उर्जितावस्था मिळवायची असेल, तर प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून धर्मनिष्ठ समाजाची निर्मिती आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कृतीशील झाले पाहिजे. काळानुसार हिंदु राष्ट्रासाठी योगदान देणे, ही श्रीगुरूंच्या समष्टी रूपाची सेवाच आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. हृषिकेश गुर्जर यांनी केले. ते बेळगाव शहरात सिटी हॉल येथे झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

याप्रसंगी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे श्री. सुजित मुळगंद म्हणाले, ‘‘भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. त्यासाठी प्रत्येकाने जागृत होऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणे आवश्यक आहे.’’ या प्रसंगी सनातन संस्थेच्या संत पूजनीय श्रीमती विजया दीक्षित यांची वंदनीय उपस्थिती होती.

याचसमवेत नंदिहळ्ळी येथे श्रीराम मंदिर येथे, रामनगर येथील श्री रामलिंग मंदिर समुदाय भवन येथे आणि खानापूर येथे श्री केदार मंगल कार्यालय येथे मराठी भाषिक, तसेच कन्नड भाषेत बेळगाव शहरात सुभाषनगर येथील श्री सत्य प्रमोद कल्याण मंटप आणि रायबाग येथे सिद्धेश्‍वर गल्ली येथील श्री महादेव मंगल कार्यालय येथे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. हा महोत्सव देशभरात 154 ठिकाणी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या महोत्सवात कोल्हापूर येथे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधनाप्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूंकडून शिकणे’, हा मराठी भाषेतील, देशभरात अन्य ठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमांच्या ठिकाणी मराठी भाषेतील ‘श्री. अशोक भांड यांचा साधनाप्रवास’, तसेच इंग्रजी भाषेतील ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेज् स्पिरिच्युअल वर्कशॉप्स इन 1992’, ‘सिकर्स रिव्हील युनिक फेसेटस् ऑफ परात्पर गुरु डॉ. आठवले’, ‘एफर्टस् ट द स्पिरिच्युअल लेवल फॉर रिमूव्हल ऑफ पर्सनॅलिटी डिफेक्टस्’ आणि ‘हाऊ टू प्रोग्रेस फास्टर स्पिरिच्युअली थ्रू सत्सेवा ?’ या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य व विज्ञान मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन वाडीकर, मराठा तितुका मेळवावा संघटनेचे अध्यक्ष रणजित घरपणकर यांसह जिज्ञासू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

9 भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ : यंदाच्या वर्षी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलुगु, गुजराती, बंगाली, ओडिया या 9 भाषांत ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील हजारो भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला. ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते ‘इम्पॉर्टन्स ऑफ गुरु’ या ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले.

आपला नम्र,

श्री. आबासाहेब सावंत , सनातन संस्था, बेळगाव (संपर्क क्रमांक – 78924 00185)

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!