ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनी विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली.
तसेच सदर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या निवेदनात कुली कामगारांचे तीन महिन्याचे वेतन दिले नसल्याने ते लवकरात लवकर देण्यात यावे अशी मागणी केली.तसेच त्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करावी अशी मागणी देखील यावेळी निवेदनाद्वारे केली.
यावेळी सदर निवेदन ग्रामीण कुली कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बैलहंगल रामदुर्ग सौंदत्ती गोकाक खानापूर कित्तूर तसेच बेळगाव तालुक्यातील मजूर आंदोलनात सहभागी झाले होते.