निपाणी, मंगळवारी श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर यांनी स्थापन केलेल्या श्री सटवाई मंदिरामध्ये त्रैवार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यात्रेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. निपाणी व पंचक्रोशीतील बालगोपाळांचे स्वास्थ तब्येत सुदृढ राहावी व चांगली राहावी यासाठी प्रत्येक माता ही पाचव्या दिवशी सटवाई देवीची पूजा करते. म्हणूनच श्रीमंत सिद्धजीराजे निपाणकर यांनी निपाणी शहर व पंचक्रोशीतील बालगोपाळ करता हे मंदिर उभा केले आहे. यात्रेनिमित्त सकाळी सटवाई रोड येथील समस्त भगिनी मंडळ गावातील प्रमुख मार्गावरून शेकडोच्या संख्येने जल कलश सजवून प्रमुख मार्गावरून वाजत गाजत सटवाई मंदिर येथे आणण्यात आले.
त्यानंतर निपाणकर घराण्याची वंशज श्रीमंत दादाराजे निपाणी येथील सटवाई देवी उत्सव सोहळ्यात अभिवादन करताना मंत्री शशिकला जोल्ले, सौ व श्री श्रीमंत दादाराजे देसाई, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा व इतर मान्यवर. व श्रीमंत सौ सम्राजलक्ष्मी राजे निपाणकर यांचे सर्व सटवाई रोड वासीयांनी स्वागत केले. त्यानंतर निपाणकर सरकार दाम्पत्यचे हस्ते देवीची विधी पूर्वक अभिषेक घालण्यात आला. अभिषेकानंतर देवीची महाआरती करण्यात हस्ते करण्यात आली.
यावेळी कर्नाटक राज्याच्या धर्मादाय हाज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले यांनी देवीची ओटी भरली. तर श्रीमंत सम्राजलक्ष्मीराजे निपाणकर यांच्या हस्ते मंत्री जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले, श्रीमंत विजयराजे निपाणकर. श्रीमंत दादाराजे निपाणकर, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे पूजन करून वाटप करण्यात आले. माजी आमदार काकासाहेब पाटील, बोरगावचे युवा नेते उत्तम पाटील यांनी देखील देवीचे दर्शन घेतले त्यांचाही सत्कार श्रीमंत विजयराजे निपाणकर यांच्या हस्ते करण्यात आला