हलगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष प्रकाश लोहार यांचे निधन
हलगा ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष प्रकाश महादेव लोहार वय 59 रा.मरगाई गल्ली हलगा यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात वडील,पत्नी,एक भाऊ सात बहिणी पूतणे असा मोठा परिवार आहे.मंगळवारी सकाळी 9:30 वाजता अंतिम संस्कार होणार आहेत तर गुरुवारी सकाळी 8 वाजता रक्षा विसर्जन केली जाणार आहे.
गेल्या सात दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते.प्रकाश लोहार यांनी गेली हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य अशी पद भूषवली होती.हलगा परिसरातील सामाजिक कार्यात ते नेहमी आघाडीवर रहात होते गावांतील अनेक सामाजिक,धार्मिक कार्यात त्यांचा मोलाचा योगदान होते.