काकतीमध्ये हायवेवर शिवाजी लोहार गॅरेजच्या विरुद्ध दिशेला आज सकाळी एक अपघात झाला . एक भरधाव स्विफ्ट कार डिव्हायडरला आदळून रोडच्या मध्यभागी पलटी झाली.
यावेळी स्विफ्टचे मालक कृष्णा बाबले व त्यांची पत्नी कवळीकट्ट्यावरून गोव्याला जात होते त्यावेळी काकतीमध्ये ओव्हरटेक करत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला .
यावेळी गाडी डिव्हायडरला आदळून विरुद्ध दिशेला पलटी झाली .यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही सदर अपघाताची काकती पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद झाली आहे