डोणी नदीवरील पूल अति पावसामुळे पुराच्या पाण्याखाली गेला आहे. मात्र याच पुलावरून ते जबाबदारपणे चालकाने बस घेऊन गेल्याचा प्रकार पुढे आला आहे.
विजयपूर जिल्ह्यातील देवर हिप्परगी तालुक्यातील सातीहळी गावातील डोणी नदी पुलावरील चालकाचा बेजबाबदारपणा प्रवाशांच्या जीवावर बेतताबेतता चुकला आहे.
के एस आर टी सी परिवहन मंडळाच्या बस चालकाने पुराचा धोका लक्षात न घेता बेजबाबदारपणे या पुलावरून बस चालविली. यावेळी प्रवासी चांगलेच भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले
मात्र यावेळी चालकांनी कशाचीही पर्वा न करता बस पुढे नेली.यावेळी दैव बलवत्तर म्हणून सर्वजण बचावले अन्यथा चालकाचा आगाऊपणा प्रवाशांच्या जीवावर बेतला असता.