प्रबुद्ध भारत बेळगावतर्फे रविवार दि. 7 रोजी रात्री 8.30 वाजता भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. टिळक चौक येथे होणाऱ्या या कार्यक्रमात भारतमातेचे पूजन, निवृत्त जवान सिद्धाप्पा चांगू उंदरे, कारगिल युद्धातील हुतात्मा भरत मस्के यांच्या पत्नी श्रीमती लक्ष्मी भरत मस्के यांचा सत्कार होणार आहे. पूज्य गुरुबसवलिंग महास्वामी, दुरदुंडीश्वर मठ कडोली यांचे सानिध्य लाभणार आहे. श्री रामचंद्र एडके याचे भाषण होणार आहे. देशभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबुद्ध भारत संस्थेने केले आहे
प्रबुद्ध भारततर्फे 7 रोजी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम
By Akshata Naik
Previous articleअन प्रवासी चांगलेच भयभीत झाले
Next articleसाधेपणाने जिंकली सर्वांची मने