शुक्रवारपासून शहरात हायदोस घातलेला बिबट्या गोल्फ कोर्स मैदान जंगल ला बसविलेल्या 16 ट्रॅप कॅमेऱ्यापैकी एका कॅमेराने बिबट्याचे चित्र कैद केले आहे.
शुक्रवारी शहरातल्या जाधव नगर या वस्तीत शिरून गवंडी कामगाराला जखमी केल्यानंतर त्या बिबट्या चा वापर जाधव नगर परिसरात होता. तसेच त्याला पकडण्याकरिता जोरदार प्रयत्न सुरू होते. यासाठी एसडीआरएफ अग्निशमन दलाच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येत होते.
मात्र बिबट्यास कोणत्याच ठिकाणी दिसत नसल्याने अनेकांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले. मात्र वन खात्याने गोल्फ कोर्स जंगल परिसरात 16 कॅमेरे आणि सात सापळे रचले आहेत.
यातील एका कॅमेरात बिबट्याचे चित्र कैसे झाले असून या बिबट्याचा वावर याच परिसरात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथील आजूबाजूच्या परिसरातील शाळांना देखील सुट्टीचा आदेश बजाविण्यात आला आहे.
तसेच या बिबट्याला पकडण्याकरिता वन खाते पोलीस विभाग एस डी आर एफ अग्निशमनदल शर्थीचे प्रयत्न करत आहेत.