सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघातर्फे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक, चेअरमन अशोक वाय पाटील होते.
प्रथम व्यवस्थापक एन. वाय.चौगले
यांनी प्रास्ताविक मनोगत करून सर्वांचे स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सल्लागार मारुती पाटील यांच्या हस्ते करुन दीप प्रज्वलन सल्लागार टोपाण्णा पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी संचालक एल. जी. चौगुले,यल्लाप्पा पाटील, शिवाजी पाटील, रुक्मिणी कांबळे, डॉ. सुनिता बेळगुंदकर व विद्यार्थीनी केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.
ध्वजारोहण निवृत्त मुख्याध्यापक व सल्लागार प्रकाश बेळगुंदकर यांच्या हस्ते करण्यात आले. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे महत्व अशोक पाटील कृष्णा पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. शेवटी आभार हेमा चौगुले यांनी मानले. यावेळी देशभक्तीपर
गीते व राष्ट्रगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाला सभासद, ठेवीदार व ग्रामस्थ उपस्थित होते.