अखिल भारतीय मराठा जागृती मंच, गोवा ,आणि मराठा सेवा संघ ,गोवा शाखा, यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यतादिन 75वा सुवर्ण महोत्तसव देशप्रेमी मोठ्या आनंदी उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी या सुवर्ण दिनी संस्थांच्या वतीने गोमंतक भूमीत देशभक्ती वाढीस लागो देश सेवा प्रत्येकाच्या हातून घडो .या देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र सेवा बजावत असतात. तशीच सेवा समाजासाठी पोलीस अधिकारी हे अहोरात्र जनतेसाठी सेवा बजावत असतात .
त्यामुळे डायगे ग्रेशिअस ,पीआय प्रविण शिमेगुरशबार ,पीएस आय ,मा,संकेत तळेकर,श्रीमती अनुष्का दळवी,यलयचशी,विदेश नाईक,रूपेश नाईक,शैलेश नाईक पीसी,गिरीश नाईक,श्रीमती अश्र्लिका फर्नाडीस,गौतम लोकरे, यांनी केलेल्या कार्यासाठी सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
तसेच सृष्टीचे संतुलन राखण्यासाठी प्रांगणात अनेक प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले .त्यानंतर जिलेबी वाटप करून अमृतमहोत्सव स्वातंत्र दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला .
या प्रसंगी संस्थांचे वरीष्ठअधिकारी कल्लापा पाटील नामदेव शिंदे रामचंद्र पाटील चंद्रकात पाटील बळवंत पाटील राजाराम गावडे भरत पाटील विश्वनाथ गुरव जयवंत पाटील विठोबा रेबोळकर हनुमंत पवार रामचंद्र बिर्जे अमोल पाटील प्रदिप गावडे
अक्षय गावडे इतर सर्व देशभक्त शिवप्रेमी मावळे उपस्थित होते .