स्वातंत्रदिन व शाळेच्या शतक महोत्सवाचे औचित्य साधुन महिला विद्यालयात देशभक्तीपर गीत स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन सौ. श्रुती कुलकणी व बॅड मास्टर बजंत्री सर तसेच शाळेचे मुख्याद्यापक व्ही. एन. पाटील सर व्यासपीठावर उपस्थित होते.
शाळेतील भारती, मालती, ज्योती व क्रांती या चार गटानी मोठ्या जोशात देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी परीक्षक कुलकर्णी यांनी “देशाविषयी अभिमान बाळगुन देशाची सेवा करा ” असा महत्वाचा संदेश विद्यार्थीनिनां दिला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक भारती गट, दुसरा क्रमांक क्रांती गट तर तिसरा क्रमांक ज्योती गटाने पटकाविला. या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. माधुरी होनगेकर यांनी केले तर शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एन. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.