बेळगाव समादेवी गल्ली येथील पंतवाड्याच्या वतीने उद्या शुक्रवार दिनांक 19 रोजी पंत जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पंत जन्माष्टमी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
उद्या सकाळी सात ते साडेआठ या वेळेत पारंपारिक भजन, 9 ते साडेनऊ अलका दानी यांचे भजन, साडेनऊ ते दहा यमुनाक्का भजनी मंडळाचे भजन, दहा ते साडेदहा सीमा कुलकर्णी यांचे भजन, साडेदहा ते साडेअकरा या वेळेत स्वरूपा इनामदार यांचे प्रवचन, साडे अकरा ते बारा श्रींची आरती होईल.
दुपारी बारा ते दोन प्रसाद, दुपारी 2:30 ते 4:30 पारंपारिक भजन व श्रींचा जन्मकाळ सोहळा, साडेचार ते पाच दरम्यान दत्तात्रयांचा गोंधळ, सायंकाळी पाच ते साडेपाच या वेळेत यमुनाक्का भजनी मंडळाची पारंपरिक टिपरी असे कार्यक्रम होणार आहेत. सुंठवडा प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. अशी माहिती पंत भक्त मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.