कैपिटल वन या संस्थेची 14 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक अध्यक्ष श्री शिवाजीराव हंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. केवळ सभासदांचा विश्वास व संस्थेच्या कार्यक्षमतेच्या जोरावर गेली दोन ते अडीच वर्षे कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत संस्थेने आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला.अशा प्रकारे संस्थेचे ब्रीद वाक्य सगळ्यांसाठी सगळकाही’ व ‘कॅपिटल वन म्हणजेच भांडवलाचे ध्रुवीकरण हा अर्थ सार्थ ठरविला असे प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की, संस्थेने सन 2021-22 या आर्थिक वर्षात प्रगतीचा वेग साधत सुमारे 20, 60 कोटी रुपयांच्या ठेवी, 26.34 कोटी रुपयांचे खेळते भांडवल व 87.69 लाख रुपयांच्या भाग भांडवलाच्या आधारे 107 37 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल करीत 21.16,839, 62 रुपये इतक्या विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. तसेच सभासदांना 8% लाभांश देण्याची घोषणा देखील यावेळी करण्यात आली.
संस्थेच्या आर्थिक कामकाजा बरोबरच सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात सुरू असलेल्या अभियानांना कोरोना महामारीमुळे काहीशी शिथीलता आली,पण येणाऱ्या वर्षात नव्या जोमाने, नव्या संकल्पनेने या अभियानास दमदार सुरुवात करण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. भविष्यात संस्थेच्या उलाढालीमध्ये वाढ करण्यासाठी कर्जदारांना कमीत कमी व्याजदरात कर्जपुरवठा तर ठेवीदारांना जास्तीत जास्त व्याजदर देण्याचा संस्था प्रयास करीत आहे.
संस्थेच्या मुख्य व्यवस्थापिका राजश्री उंदरे यांनी अहवालाचे वाचन व सभेपुढील विषय वाचले. यावेळी प्रत्येक विषय व अहवालावर सविस्तर विवेचन श्री हंडे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष शाम सुतार सर्वश्री रामकुमार जोशी, शिवाजीराव अतीवाडकर, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी पिग्मी संकलकांनी सभेच्या आयोजनामध्ये विशेष योगदान दिले. संस्थेचे उपाध्यक्ष शाम सुतार यांनी आभार प्रदर्शन केले.