बेळगाव:
येथील जायंट्स आय फौडेशनच्या नेत्रदान जागृती संकल्प अभियाना अंर्तगत इंद्रप्रस्थ नगर येथील प्रितीलता गजानन हावळ यांनी सामाजिक बांधीलकी जपत नेत्रहीनांना दृष्टि लाभ व्हावा या उदात्त हेतूने नेत्रदानाचा संकल्प करून नेत्रदान संबंधित कागदपत्रे जायंट्स आय फौंडेशनचे संचालक अजित कोकण व लक्ष्मण शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.
जायंट्स आय फौंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी केलेल्या संकल्पाचे कौतुक करण्यात येत असून प्रत्येक व्यक्तीने मरणोत्तर नेत्रदान करावे असे सांगण्यात आले.
या वेळी गजानन हावळ,हेमंत हावळ व संपदा क्षिरसागर उपस्थित होते.