बेळगाव शहर आणि तालुका फोटो आणि व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्यावतीने जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर कार्यक्रम गंगाधर शानबाग चेंबर मध्ये पार पडला.
यावेळी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन आर एम चौगुले यांनी केले. तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आर एम चौगुले नेता देशपांडे रोटेरियन उमेश रामगुरवाडी अजित शानबाग उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर भरमा मोटरे यांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर प्रास्ताविक भाषण संजय हिशोबकर यांनी केले त्यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात सुभाष ओउळकर बाबा रामण्णावर आणि विनोद कट्टी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर डी बी पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात आपले विचार मांडले. तर आभार नामदेव कोलेकर यांनी मानले.