वरेरकर नाट्य संघातर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .यावेळी
आझादी का अमृत महोत्सव’ या निमित्त भरविलेली चित्रकला स्पर्धा अत्यंत यशस्वी झाली. एक हजाराहून अधिक स्पर्धकानी त्यात भाग घेतला.
विशेषतः छोट्या मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि खुला गट अशा चार गटात स्पर्धा झाली. यावेळी चारही गटांना संस्थेने विविध विषय दिले होते.
या स्पर्धेचे परिक्षण लवकरच करून विजेत्या स्पर्धकाना निकाल कळविला जाणार आहे त्याच प्रमाणे बक्षीस पात्र चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी मध्ये हे प्रदर्शन शुक्रवार दि. 26 रोजी सायंकाळी 5 वा – खुले होईल. त्यानंतर ते 28 ऑगस्ट पर्यंत सर्वाना पाहण्यासाठी खुले राहील. चित्र स्पर्धेचा बक्षीस समारंभ 26 रोजीच प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात होणार आहे तसेच .विजेत्या स्पर्धकांना वैयक्तरित्या कळविले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे .