चन्नम्मानगर येथील वॉकर्स ग्रुपचे दुसरे संमेलन बुधवारी (ता. २४) सायंकाळी ५ वाजता सुभाषचंद्रनगर नागरिक संघटना हॉल (उत्सव हॉटेलमागे) येथे होणार आहे.
कोरोना महामारीमुळे सदर संमेलन तीन वर्षांनी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित रहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव असतील.
कार्यक्रमावेळी डॉ. हलगेकर हे आरोग्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे.
सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन वॉकर्स ग्रुपतर्फे कृष्णा मजुकर, प्रदीप परब, रमेश रायजादे यांनी केले आहे.