दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री नारायण पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी सैनिक श्री अजय तिबिले व कॉन्ट्रॅक्टर सुनील किल्लेकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली मुख्याध्यापक श्री पी आर पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या असते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी लायन्स क्वेस्ट सकारात्मक कौशल्य पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
श्री आर एन पाटील व श्रीमती एल पी झंगरूचे यांनी आपण घेतलेल्या लायन्स क्वेस्ट प्रशिक्षणा बद्दल माहिती सांगून पालकांना व विद्यार्थ्यांना दिलेल्या पुस्तकाविषयी सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले श्रीमती आर ए परब यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची व विद्यार्थ्यांची कर्तव्य याबद्दल सविस्तर माहिती कथन केले श्री जी आय गुंजेटकर यांनी शाळेचे नियम शिस्त व शाळेत वर्षभर होणाऱ्या उपक्रमाविषयी माहिती दिली.
त्यानंतर श्रीमती एस एम पाटील यांनी विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला व पालकांच्या विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या समस्या विषयी चर्चा केली पालकांच्या वतीने श्री सुनील किल्लेकर व अजय तिबिले यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षकांनी केलेल्या सूचनांचे आम्ही सर्व पालक पालन करण्याचे आवाहन केले .
शेवटी श्री नारायण पाटील यांनी अध्यक्ष भाषणात शाळेच्या प्रगती विषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर ए पाटील आभार प्रदर्शन एस बी दाणणावर यांनी केले या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.