बिबट्याचा व्हिडिओ आज सकाळी बस चालकाने वायरल करताच प्रशासन जागे झाले आहे त्यामुळे या ठिकाणी मोठा फौज फाटा तयार करून तसेच सापळा रचून बिबट्या पकडण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे
यावेळी सकाळी साडे अकराच्या सुमारास बिबट्या वनिता विद्यालयाच्या शाळेच्या मागून असलेल्या परिसरातून बाहेर येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याकरिता जाळे विणले होते मात्र बिबट्याने सर्वांना चकवा देत तेथून पळ काढला
त्यामुळे वनविभागाला पुन्हा एकदा अपयश आले. यावेळी बिबट्या रेस कोर्स परिसरात पुन्हा अदृश्य झाला. सदर बिबट्याला जेरबंद करण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस व वन कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाले होते.
मात्र बिबट्याने सर्वांना चकवा देत तेथून पलायन केले. जर वनविभागाने योग्य तऱ्हेने उपाययोजना राबविल्या असत्या तर आत्तापर्यंत बिबट्या जेरबंद झाला असता मात्र वनविभाग आणि पोलीस प्रशासनाची टीम कमकुवत असल्याने बिबट्याला पकडण्यात ते अपयशी झाले आहेत.