आज सकाळी एका वाहन चालकाला बिबट्या दृष्टीस पडतात त्याने आपल्या मोबाईल मध्ये बिबट्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान वायरल झाला
सदर व्हिडिओ मध्ये बिबट्या वनिता विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात गेल्याने येथील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार या भागातील सर्व शाळां बरोबरच महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. यावेळी सकाळच्या सत्रात सुरू झालेल्या शाळांना कोणतेही नोटीस देण्यात आली नसल्याने काही विद्यार्थी शाळेत गेल्यावर त्यांना परत माघारी पाठविण्यात आले.
तसेच या भागात असलेल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मोबाईल द्वारे संदेश पाठवून सुट्टी देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा निर्णय देण्यात आला असून बिबट्या जोपर्यंत जेरबंद होत नाही तोपर्यंत सर्वांना सुट्टीच असणार आहे तसेच बिबट्या पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.