काल सकाळी एका वाहन चालकाला बिबट्या दृष्टीस पडतात त्याने आपल्या मोबाईल मध्ये बिबट्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान वायरल झालासदर व्हिडिओ मध्ये बिबट्या वनिता विद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या परिसरात गेल्याने येथील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोल्फ कोर्स परिसरातील 1 किलोमीटर परिघातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. बिबट्याच्या वावराने कॅम्पातील केंद्रीय विद्यालय क्रमांक 2, वनिता विद्यालय, मराठी विद्यानिकेतन, एनपीईटी क्लब रोड तसेच केएलई इंटरनॅशनल स्कुल कुवेंपूनगर, शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळा ( हनुमाननगर, व्हीव्हीनगर), शासकीय कनिष्ठ प्राथमिक शाळा ( कुवेंपूनगर सह्याद्रीनगर सदाशिवनगर), शासकीय कनिष्ठ मराठी प्राथमिक शाळा सदाशिवनगर या शाळांना सुट्टी देण्याचा आदेश शहर गट शिक्षणाधिकारी बजंत्री यांनी बजावला आहे.
तसेच हिंडलगा आणि विजयनगरातील 9 शाळांनाही (ग्रामीण भागातील सरकारी मराठी प्राथमिक शाळा हिंडलगा, कन्नड प्राथमिक शाळा हिंडलगा, उर्दू प्राथमिक शाळा हिंडलगा, हिंडलगा हायस्कूल, ट्विन्स लँड स्कूल हिंडलगा, सेंट पिटर स्कूल हिंडलगा, कन्नड प्राथमिक शाळा विजयनगर, मराठी प्राथमिक शाळा विजयनगर, संत मीरा स्कूल लक्ष्मीनगर) येथील शाळांना आज मंगळवारीही सुट्टी देण्यात आली आहे