उद्या दिनांक 4 फेब्रुवारी २०२२ रोजी जागतिक कर्करोग दिन यानिमित्त तारांगण व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्करोग जनजागृती अभियान कार्यक्रमाच्या अंतर्गत महिलांसाठी प्रख्यात स्त्री रोग तज्ञ व जिव्हाळा फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दू यांचे व्याख्यान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कर्करोगाचा वाढणारा प्रसार पाहता कर्करोग जनजागृती करणे गरजेचे आहे यासाठी तारांगण व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. वडगाव,वझे गल्ली येथील वनिता पाटील प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल येथे उद्या दिनांक ४फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३ वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कर्करोगाची लक्षणे, सकारात्मक दृष्टिकोनातून रुग्णाची मानसिकता बदलणे, कर्करोगाची उपचार पद्धती , कर्करोगाच्या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी या सर्वांचे मार्गदर्शन येथे केले जाणार आहे. गेली वीस वर्षे बेळगाव जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्य व स्त्री रोगाबाबत अनेक आरोग्य शिबिरे, व्याख्याने देणाऱ्या स्त्री रोग तज्ञ डॉ.सविता कद्दू जिव्हाळा फाउंडेशन च्या माध्यमातून समाजासाठी सेवा देत आहे. या शिबिराला इंडीयन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ,आयएमए सदस्य स्त्री रोग तज्ञ डॉ. सुरेखा पोटे, डॉ. अनिता उमदी, डॉ. सुचित्रा लाटकर या शिबिरामध्ये सहभागी होणार असून महिलांच्या आरोग्य तपासणी बरोबरच त्यांना सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत. महिलांनी मास्क घालने आवश्यक आहे.जास्तीत जास्त महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी कळवले आहे अधिक माहितीसाठी नेत्रा मेणसे ९९०११३७९८१, जयश्री दिवटे ९३४१४१११८६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
तारांगण व आयएमए मार्फत कर्करोग जनजागृती कार्यक्रम
By Akshata Naik
Previous articleCovid Burst in Belagavi
Next articleश्री गणेश जयंती निमित्त विशेष कार्यक्रम