-महिला पोलीस ठाणे निरीक्षक श्रीदेवी पाटी
जायंट्स सखी स्वयंसिद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
बेळगाव:आजची स्त्री ही सर्वच क्षेत्रात पुढे असून महिलांना ज्या ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या सगळ्या क्षेत्रांत त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले आहे असे महिला पोलीस ठाणे निरीक्षक श्रीदेवी पाटील म्हणाल्या.
जायंट्स सखी स्वयंसिद्धा महिला पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन संयुक्त महाराष्ट्र चौक येथे करण्यात आले होते.यावेळी महिला पोलीस ठाण्याच्या निरीक्षक श्रीदेवी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महिलांना निर्भयपणे रिक्षातून प्रवास करता यावा यासाठी प्रभा भिशिरोटी सारख्या रिक्षाचालक म्हणून इतर महिलांनी पुढे यावे असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महिलांमधील सचोटी,उद्योजकता तसेच त्यांच्या कार्यतत्परतेला प्रोत्साहन देण्यासाठी जायंट्स सखीच्या माध्यमातून दरवर्षी जायंट्स सखी स्वयंसिद्धा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सचिव सुलक्षणा शिनोळकर यांनी सांगितले.
उपस्थित पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्षा अपर्णा पाटील यांनी करून दिला.
त्यानंतर पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन श्रीदेवी पाटील यांचे स्वागत ज्योती अनगोळकर यांच्याहस्ते करण्यात आले.
यावर्षीच्या प्रथम पुरस्कार विजेत्या पिंक ऑटो चालक प्रभा बिशीरोटी यांना प्रमुख पाहुण्या श्रीदेवी पाटील आणि अध्यक्षा चंद्रा चोपडे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या वेळी फेडरेशन संचालिका नम्रता महागांवकर, शितल नेसरीकर, ज्योती सांगुकर, सुर्वणा काळे, राजश्री हसबे, वैशाली भातकांडे, वृषाली मोरे, अर्चना कंग्राळकर,शिला खटावकर, शितल पाटील दिपा पाटील, मनिषा कारेकर, वरदा आंगडी रेणू भोसले उपस्थित होत्या