सततच्या अपयशांदरम्यान, बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत आज सोमवारी 25 व्या दिवशी गोल्फ मध्ये प्रवेश केला आहे .अधिकारीया बिबटयला पकडण्यासाठी ‘हनी ट्रॅप’ पद्धतीचा वापर करत आहेत.
बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात मादी बिबट्याचे मूत्र पसरवले जात असल्याचे या कारवाईशी संबंधित असलेल्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात 250 एकर परिसरात पसरलेल्या गोल्फ क्लबच्या आवारात 350 हून अधिक जवानांनी जेसीबी, हत्ती, शार्पशूटर, भूलतज्ज्ञांच्या सहाय्याने कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे.तसेच खबरदारीचा उपाय म्हणून 21 शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे जवळपास 20,000 विद्यार्थ्यांना या बिबटयाच्या कारवाईचा फटका बसत आहे.
बिबट्याला पकडण्याकरिता अधिकाऱ्यांनी काही पिंजऱ्यात कुत्रेही ठेवले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
बिबट्या त्याच्या हालचालीची जागा बदलत असल्याने आठ छोटे पिंजरे, एक मोठा पिंजरा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची जागाही बदलावी लागली आहे.
आता शहरात बिबट्या पकडण्याची मोहीम तीव्र झाली असून हा बिबट्या गेल्या कित्येक दिवसांपासून सापडेनासा झाला असल्याने या प्रदीर्घ कारवाईमुळे जनमानसात संताप निर्माण झाला असून विरोधी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते राज्याचे वनमंत्री उमेश कट्टी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.