शिवसेनेच्यावतीने सुंदर सार्वजनिक श्री गणेशमूर्ती स्पर्धा-२०२२ चे आयोजन केले आहे. या स्पर्धा बेळगाव उत्तर व दक्षिण अशा दोन विभागात होणार आहेत. गणेशमूर्ती व मंडप परिसर या दोन्हींचे निरीक्षण होणार आहे.
विजेत्यांना प्रत्येक गटामध्ये पाच बक्षिसे देण्यात येणार आहेत. ६ सप्टेंबरपर्यंत शिवसेनेचे पदाधिकारी निरीक्षण करणार आहेत. ७ रोजी बक्षीस वितरण केले जाणार आहे. ज्या मंडळाचा प्रथम क्रमांक येईल त्याच मंडळाच्या मंडपात बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ८०५०४ २००५२ या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे