बेळगाव शहराच्या मध्यभागी असलेले सर्वात जुने व्यापारी संकुल पाडण्याचा निर्णय बेळगाव महानगरपालिकेने घेतला आहे.
महानगरपालिकेने अनेक दशकांपासून संकुलात व्यापार करणाऱ्या दुकानदारांना बजावलेल्या नोटीसमुळे त्यांची झोप उडाली आहे. पंधरा दिवसांत दुकाने रिकामी करून कॉम्प्लेक्स खुल्ला करण्याची सूचना नोटीसद्वारे करण्यात आली आहे.
बसवेश्वर सर्कल (गोवावेस) येथील पालिकेच्या व्यापारी संकुलाला अनेक वर्षे झाल्याने धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्याने दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अनेक इमारती जमीनदोस्त करणाऱ्या महापालिकेने आता बसवेश्वर सर्कलमधील व्यापारी संकुल पाडण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, त्यामुळे येथील व्यापारी अडचणीत सापडले आहेत.