महिला विद्यालय हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षिका होऊन शाळा संचालन केले, यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी ह्या मुख्याध्यापिका ते शाळेचा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग अशी जबाबदारी पार पाडली.
सकाळच्या सत्रामध्ये तास घेण्यात आले आणि दुसऱ्या सत्रामध्ये शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम करण्यात आला यावेळी शाळेची माजी विद्यार्थिनी बोलावण्याची परंपरा आहे त्याप्रमाणे 1992 च्या बॅच मधील उत्कृष्ट विद्यार्थिनी असलेल्या डॉक्टर स्मिता कंगराळकर ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थित होत्या तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सर व विद्यार्थिनी मुख्याध्यापिका झालेली कु. शामल हिरोजी ही देखील उपस्थित होती.
सुरुवातीला कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत व शाला गीत सादर केले. प्रमुख पाहुणांचा परिचय व त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत विध्यर्थीनी मुख्याध्यापिका कु. शामल हिरोजी हिने केले. इयत्ता ६वी ते इ.९वी विद्यार्थिनींनी शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बद्दलचे आपले विचार भाषणातून मांडले .
यानंतर आजच्या दिवसात विद्यार्थिनी शिक्षिका झालेल्या दोन विद्यार्थिनींनी शिक्षक होण्याचा त्यांचा अनुभव आपल्या मनोगतातून मांडला. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, मार्गदर्शन करत असताना त्यांनी सांगितलं की मला अभिमान आहे मी मराठी शाळेत शिकलेल्याचा आणि मराठी शाळेत शिकूनही आज मी विविध वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंग्रजी मधून लेक्चर घेऊ शकते त्यावेळी मला माझा मराठी असलेल्याचा आणि मराठी शाळेत शिकलेल्याचा अभिमान वाटतो. विद्यार्थिनींनो तुम्हीही असेच शिका मोठ्या व्हा असे त्यांनी सांगितले.
शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नंदिनी पाटील हिने केले तर आभार कु. संजना शिवणे हिने मानले. दहावीचे वर्ग शिक्षिका श्रीमती अस्मिता देशपांडे व श्रीमती रेखा नागण्णावर यांनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री व्ही. एन. पाटील सरांचे प्रोत्साहन लाभले