अंत्यदर्शनासाठी नागरिकांची मोठी गर्दी
कुटुंबासह गावावर शोककळा
हृदयविकाराने मृत्यू झालेल्या गोकाक तालुक्यातील लष्करी जवानावर त्याच्या मूळ गावी शासकीय इतमामात, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोकाक तालुक्याच्या मेलमट्टी गावातील शंकर बाळाप्पा यलीगार हे गेल्या 13 वर्षांपासून भारतीय लष्करात कार्यरत होते. सध्या महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे ते सेवा बजावत होते. काल दि. 13 सप्टेंबर रोजी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.
शंकर यांच्या निधनाची समजताच कुटुंबीयांना धक्का बसला शिवाय संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
दरम्यान आज सकाळी शंकर यांचे पार्थिव मेलमट्टी (ता.गोकाक) या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. यावेळी लष्करी वाहनातून गावातील प्रमुख मार्गांवरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी अंत्यदर्शनासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. लष्करी अधिकाऱ्यांनी मृत जवान शंकर त्यांच्या पत्नीला राष्ट्रध्वज सुपूर्द केला. हवेत फैरी झाडून शंकर यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. यानंतर शासकीय इतमामात आमच्या संस्कार करण्यात आले. यावेळी शंकर यांच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.