संजीवन कार्ड मुळे सरकारी कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैद्यकीय उपचाराकरिता एक लाखापासून ते वीस लाखापर्यंत खर्च सरकार उचलते. राज्य सरकारने सर्व सरकारी खात्यांमधील कर्मचाऱ्यांसाठी हे ज्योती संजीवनी योजना सुरू केली आहे .त्यामुळे ही ज्योती संजीवनी योजना महानगर पालिका कर्मचाऱ्यांना देखील लागू करावी अशी मागणी आज महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेऊन आंदोलन करून केली .
सदर योजना राज्यातील 10 महानगरपालिकांमध्ये संजीवनी योजना लागू करण्यात आली आहे ही योजना अतिशय लाभदायक असल्यामुळे राज्यातील बेळगाव सहसंबंधित 10 महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही योजना लागू करावी अशी मागणी याप्रसंगी केली.
यावेळी सर्वजण आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी महानगरपालिकेतील कार्यालयीन काम बंद ठेवून सर्वजण एकत्रित महापालिकेच्या समोर जमा झाले आणि जोरदार घोषणाबाजी देत ज्योती संजीवनी योजना सुरू करावी अशी मागणी केली