माडीगुंजी गावचे सुपुत्र वीरभद्र बुरुड हे भारतीय लष्करात 20 वर्षे सेवा बजावून गावी परतले आहेत. त्यांचा ग्रामस्थ आणि गूंजी सोशल फाउंडेशन च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. गावातील सर्व निवृत्त जवान यावेळी उपस्थित होते.
सोशल फौंडेशन चे कार्यकर्ते विरभद्र (बुड्या) बुरुड यांचा भारतीय सेनेतून सेवा बजावून निवृत्त झाल्याबद्दल माऊली मंदिर येथे एक्स आर्मी ग्रुप तर्फेही सत्कार करण्यात आला. गुंजी सोशल फौंडेशन कडून विरभद्र बुरुड यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
दयानंद गुरव, प्रसाद गुरव,मोनेश्री कुंभार,दीपक देसाई,संदीप घाडी,प्रताप नारकळ,गंगाराम पाटील,संदीप गुरव,विशाल गुरव,अमोल बेळगावकर, विनायक कुलकर्णी आदी उपस्थित होते