बेंगळुरूच्या केएस्आर रेल्वे स्थानकावर अनधिकृत प्रार्थनास्थळाच्याविषयात धर्मिक भावना बिघडविणार्यांविरुद्ध कारवाई करण्याविषयी समस्त हिंदू संघटनांच्या वतीने पोलीस कमिशनर यांना निवेदन देण्यात आले आहे.
समस्त हिंदू संघटनांच्या वतीने आज ३ फेब्रुवारी या दिवशी बेंगळुरू पोलीस कमिशनर यांना बेंगळुरूच्या रेल्वे स्थानकावर अनधिकृत प्रार्थनास्थळासंदर्भात धर्मभावना बिघडविणार्या, हिंदू कार्यकर्त्यांना धमकी देणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याविषयी आग्रह करून निवेदन देण्यात आले.
निवेदनात समस्त हिंदू संघटनांच्या वतीने केएस्आर रेल्वे स्थानकाच्या क्रमांक ५ या रेल्वे फलाटावरील कूली कर्मचार्यांच्या विश्रांती कक्षाला अनधिकृत प्रार्थनास्थळ बनविणार्यांच्या विरुद्ध कायद्याच्या चौकटीत राहून निवेदन देण्यात आले. संघटनांच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन मान्य रेल्वे विभागीय अधिकार्यांनी अनधिकृत प्रार्थनास्थळाचे पुन्हा रेल्वे सहाय्यक कर्मचार्यांचे विश्रांती गृहात रूपांतर केले; या विषयी आम्ही रेल्वे पोलीस, अधिकारी यांचे अभिनंदन करतो; परंतु त्या घटने नंतर काही धर्मांध संघटना या घटनेला जातीय रंग देऊन नगरातील जातीय सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड होत आहे.
१. १ फेब्रुवारीला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे बेंगळुरू जिल्हाध्यक्ष सैयद जावेद यांनी कायद्याच्या चौकटीत राहून कार्य करणार्या हिंदू कार्यकर्त्यांच्या संदर्भात ‘गुंड’ अशा असंवैधानिक भाषेचा उपयोग केला आहे.
२. फेब्रुवारी २ ला एआयएम्आयएम् पक्षाचे नेते केएस्आर रेल्वे स्थानकावर जाऊन तिथल्या अनधिकृत प्रार्थनास्थळाचे समर्थन करून पुन्हा मशिद निर्माण करण्याविषयी बोलले आहेत.
३. फेब्रुवारी ३ ला हिंदू कार्यकर्ते अतुल कुमार यांना +१ ६३९३९३०१५४ या क्रमांकावरून दूरभाष करून तुमचा दिनांक निश्चित झाला असून तुम्हाला शुक्रवारच्या आत संपवू, अशी मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
४. सोशल मिडिया तसेच आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सहस्रो लोक रेल्वे स्थानकावर जाऊन नमाज पढणार असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर सहस्रो लोक एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिथल्या देवस्थानांना संरक्षण द्यावे.
एकूण या सर्व घटनांमुळे काही समाजविघातक शक्ती या घटनेला जातीय रंग देऊन नगरातील जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी जातीय भावना बिघडविणार्या संघटनांचे नेता, पक्ष प्रमुख यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून हिंदू कार्यकर्त्यांना रक्षण देण्यात यावे, असे या माध्यमातून सांगत आहोत.
१. श्री. सुंद्रेश नरगल, प्रधान कार्यदर्शी, श्रीराम सेना.
२. श्री. अमरनाथ, संघटना कार्यदर्शी, श्रीराम सेना.
३. श्री. सुरेश जैन, अध्यक्ष हिंदू महासभा
४. श्री. पुनित कुमार एन्.एस्. बजरंगदळ, बेंगळुरू.
५. श्री. मोहन गौडा, राज्य प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती